ताज्या घडामोडी

राजगड-वेल्हे तालुका ‘भारतीय बौद्ध महासभा’ महिला कार्यकारणीची घोषणा; अध्यक्षपदी वैशाली गंगावणे

मुक्त संपादिका नीलम पवार,

राजगड-वेल्हे तालुका ‘भारतीय बौद्ध महासभा’ महिला कार्यकारणीची घोषणा; अध्यक्षपदी वैशाली गंगावणे

विंझर वार्ताहर दि २७ : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) पुणे जिल्हा पूर्व अंतर्गत ‘राजगड-वेल्हे’ तालुका महिला विभागाची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. विंझर येथील सिद्धार्थ प्रतिष्ठान बुद्ध विहार येथे पार पडलेल्या विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया उत्साहात संपन्न झाली. यामध्ये राजगड-वेल्हे तालुका महिला अध्यक्षपदी वैशाली उर्फ वर्षा सुनील गंगावणे (वांगणी) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

भारतीय बौद्ध महासभेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जुन्या कार्यकारणीचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ती बरखास्त करून नवीन निवडी करण्यात आल्या. पुणे जिल्हा पूर्व महिला अध्यक्षा आयु. सुजाताताई ओव्हाळ, सरचिटणीस मंजुषाताई धावारे आणि संघटक शालिनीताई रोकडे यांनी इच्छुक महिलांचे अर्ज स्वीकारून व मुलाखती घेऊन या सक्षम टीमची घोषणा केली.नूतन पदाधिकारी खालीलप्रमाणे:या कार्यकारणीत सरचिटणीस म्हणून काजल ओमकार कांबळे (मार्गासनी) तर कोषाध्यक्षपदी शिल्पा किरण भिंगारे (खामगाव) यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी कोमल आकाश कांबळे (संस्कार), कविता बाबुराव गंगावणे (प्रचार-पर्यटन) आणि नूतन संतोष गायकवाड (संरक्षण) यांची नियुक्ती करण्यात आली.इतर महत्त्वाच्या पदांवर मधुश्री समीर कांबळे, अर्चना रविराज गायकवाड, वैशाली प्रभाकर हांडे, वैशाली चंद्रकांत गायकवाड, पूजा संजय गायकवाड आणि उज्वला नवनाथ गंगावणे यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. कार्यालयीन सचिवपदी पल्लवी विशाल गायकवाड तर हिशोब तपासणीस म्हणून रिया संपत भिंगारे काम पाहणार आहेत.

 

संघटक म्हणून यांची निवड:

 

संघटक पदाची जबाबदारी स्वाती कैलास गायकवाड, गौरी प्रदीप कांबळे, हर्षल अनिल भिंगारे, सारिका किरण आल्हाट, निर्मला विलास गायकवाड आणि दीपमाला सनी गायकवाड अशा एकूण २१ महिलांच्या खंबीर टीमवर सोपवण्यात आली आहे.

 

विशेष म्हणजे, चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीचे औचित्य साधून या नूतन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत, आगामी काळात धम्म प्रचाराचे आणि सामाजिक क्रांतीचे कार्य अधिक वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त केला.

Share

मुख्य संपादिका - निलम पवार

‘सत्यवार्ता न्यूज’ ([https://satyawartanews.in/](https://satyawartanews.in/)) हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि समाजाभिमुख डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, पारदर्शकता आणि लोकहित यांना सर्वोच्च प्राधान्य देणारे माध्यम म्हणून ओळखले जाते. मुख्य संपादिका नीलम पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली हे पोर्टल स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचे सखोल, वस्तुनिष्ठ आणि जबाबदारीने वार्तांकन करते. समाजातील उपेक्षित घटकांचे प्रश्न, जनतेच्या भावना आणि वास्तव परिस्थिती यांना आवाज देणे हे ‘सत्यवार्ता न्यूज’चे प्रमुख ध्येय आहे. धाडसी पत्रकारिता, तथ्याधारित विश्लेषण आणि निर्भीड मांडणी यांच्या माध्यमातून हे पोर्टल वाचकांमध्ये विश्वास निर्माण करत आहे. बदलत्या डिजिटल युगात वेगवान, अचूक आणि प्रभावी माहिती पुरविण्याच्या दृष्टीने ‘सत्यवार्ता न्यूज’ एक सक्षम आणि प्रामाणिक व्यासपीठ ठरत आहे. समाजहितासाठी कटिबद्ध राहून सत्याच्या बाजूने उभे राहणे हीच या पोर्टलची खरी ओळख आहे.
Back to top button