ताज्या घडामोडी

नवरा-बायकोच्या किरकोळ भांडणातून मोठा वाद; धारदार शस्त्राने हल्ला, तिघे गंभीर जखमी*

मुख्य संपादिका नीलम पवार

*नवरा-बायकोच्या किरकोळ भांडणातून मोठा वाद; धारदार शस्त्राने हल्ला, तिघे गंभीर जखमी*

पुणे, दि. २५ मार्च (प्रतिनिधी): मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवरा-बायकोच्या किरकोळ भांडणातून मोठा वाद निर्माण होऊन त्याचे हिंसक रूपांतर झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात शिवीगाळ करत धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी तक्रारदार रोहितसिंग सुरजीतसिंग भोंड यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी संबंधितांवर बी.एन.एस.एस. अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. या गुन्ह्यात सागरसिंग जुनी, पिल्लूसिंग जुनी, कृष्णासिंग जुनी, अवतारसिंग जुनी, कन्हैयासिंग जुनी, ओमकारसिंग जुनी आणि शंकरसिंग जुनी यांचा समावेश एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरा-बायकोमधील किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. त्यानंतर आरोपींनी एकत्र येत तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला चढवला. या घटनेत तक्रारदार रोहितसिंग भोंड, त्यांचे वडील सुरजीतसिंग भोंड तसेच भाऊ रोनकसिंग भोंड हे गंभीर जखमी झाले.

जखमींवर सध्या पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Share

मुख्य संपादिका - निलम पवार

‘सत्यवार्ता न्यूज’ ([https://satyawartanews.in/](https://satyawartanews.in/)) हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि समाजाभिमुख डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, पारदर्शकता आणि लोकहित यांना सर्वोच्च प्राधान्य देणारे माध्यम म्हणून ओळखले जाते. मुख्य संपादिका नीलम पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली हे पोर्टल स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचे सखोल, वस्तुनिष्ठ आणि जबाबदारीने वार्तांकन करते. समाजातील उपेक्षित घटकांचे प्रश्न, जनतेच्या भावना आणि वास्तव परिस्थिती यांना आवाज देणे हे ‘सत्यवार्ता न्यूज’चे प्रमुख ध्येय आहे. धाडसी पत्रकारिता, तथ्याधारित विश्लेषण आणि निर्भीड मांडणी यांच्या माध्यमातून हे पोर्टल वाचकांमध्ये विश्वास निर्माण करत आहे. बदलत्या डिजिटल युगात वेगवान, अचूक आणि प्रभावी माहिती पुरविण्याच्या दृष्टीने ‘सत्यवार्ता न्यूज’ एक सक्षम आणि प्रामाणिक व्यासपीठ ठरत आहे. समाजहितासाठी कटिबद्ध राहून सत्याच्या बाजूने उभे राहणे हीच या पोर्टलची खरी ओळख आहे.
Back to top button